शिरोळ येथे मंडप व लायटिंग उद्योजकाचा रविवारी मेळावा

शिरोळ तालुका मंडप व लाईटीग असोसिएशनच्या वतीने रविवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता तालुकास्तरिय उद्योजकाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. येथील टारे क्लब हाऊस येथे मेळावा होईल अशी माहिती असोसिएशनचे सल्लागार योगेश माने यांनी पत्रकाराना दिली. कोल्हापूर जिल्हासह राज्यातील मंडप, लाईटिग उद्योग व्यावसायिकाना आर्थिक मंदीचा फटका बसला असून गेल्या दोन वर्षातील कोरोना काळात तसेच अन्य कारणामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. अशा परिस्थितीत शासनाने मंडप लाईटीग, डेकोरेटर्स, बँड यासह संलग्न उद्योजकाना आर्थिक सहकार्य करावे, उद्योग व्यवसायाला अनुदान स्वरुपात आर्थिक मदत करावी यासह अन्य मागण्याबाबत या मेळाव्यामध्ये चर्चा होणार आहे.

Join our WhatsApp group