मोठी बातमी! कर्जाचे हप्ते पुन्हा वाढणार, RBI कडून रेपो दरात अर्धा टक्क्याची वाढ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी शु्क्रवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. रेपो रेट 4.90 टक्क्यांवरून आता 5.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो रेड वाढल्याने गृहकर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने बेजार झालेली जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.RBI चे गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याआधी रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने व्याजदरात दोन टप्प्यात 0.90 टक्क्यांची वाढ केली होती. मात्र,शु्क्रवारी पुन्हा रेपो रेटमध्ये 0.50 टक्यांची वाढ केली आहे. एका वर्षांत आतापर्यंत रेपो रेटमध्ये तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

Join our WhatsApp group