मजरेवाडी गावात मुस्लिम समाज नसताना सुद्धा पीरपंजा स्थापन

मजरेवाडी तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे गावात एकही मुस्लिम बांधव नसताना पिरपंजा स्थापन केला जातो . भारत हा सर्व धर्म समभाव असलेला देश आहे.प्रत्येक धर्माची वेगवेगळे सण आहेत. हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य असलेला हा पीर पंजा हा नवसाला पावणारा आहे.

गावातील सर्व नागरिक मिळून पीरपंजा स्थापन करतात.संस्थान कालापासून ही परंपरा जपत आलेली आहे.कमिटी अध्यक्ष बापूसो हेरवाडे उपाध्यक्ष सुभाष बंडगर, बाळासो बंडगर, मयूर पट्टेकरी, प्रकाश बसर्गे ,अनिल पट्टेकरी , अजित खेमाने ,व इतर सर्व गावातील नागरिक व मंडळे मोहरम कमिटी नियोजन करतात.कुरुंदवाड तालुका:- शिरोळ येथील मुल्ला( पुजारी) दादासो बस्तीगीर हे पूजेचे काम पाहतात.पटवर्धन सरकार यांच्या काळापासून स्थापना होत आहे.हजरत पिरान पीर दौलत शहा व हजरत मौला अली स्थापन करतात.

येथे भाविकांची मनोकामना पूर्ण होते.हिंदू-मुस्लीम यांचे हे प्रेरणास्थान झाले आहे.

Join our WhatsApp group