आदित्य ठाकरे आणि दिशा यांच्या मैत्रीची आजही चर्चा, वर्षांपूर्वी गाजला होता किस्सा

सध्या फ्रेंडशिप डे ची चर्चा सगळीकडे सुरू आहे. अशात फ्रेंडशिप (Friendship) म्हटलं की अनेक मैत्रीच्या अनेक जोड्या समोर येतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक लोकांमध्ये मैत्री दिसून येते. मग ते क्रिकेट असो किंवा चित्रपटसृष्टी असो किंवा राजकीयसृष्टी असो. या क्षेत्रातील कित्येक लोक एकमेकांचे जिगरी मित्र आहेत अशात एक गाजलेल्या मैत्रीचा किस्सा आपण जाणून घेणार आहोत.

राजकीय क्षेत्रातलं भरारीचं नाव म्हणजे आदित्य ठाकरे आणि बॉलिवूडमधील बोल्ड (Friendship) अभिनेत्री दिशा पाटनी यांची मैत्री. यांची मैत्री काही वर्षापूर्वी चर्चेचा विषय होती. विशेष म्हणजे योगायोगाने का असो यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच १३ जूनला असतो त्यामुळे हेच त्यांच्या मैत्री असण्याचं कारण असू शकतं, असं म्हणायला हरकत नाही.

किस्सा आहे २०१९चा जेव्हा या दोघांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांची एक डिनर डेटनी अख्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आणि चर्चेला उधाण आलं. २०१९ मध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या काही दिवसाआधी आदित्य ठाकरे आणि दिशा पाटनी डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. त्यावेळीचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि त्या दोघांच्या डेटची चर्चा रंगली पण या चर्चेला पुर्णविराम तेव्हा लागले जेव्हा यावर दिशा आणि आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.

दिशा पाटनी म्हणाली होती की, ‘आपण आपल्या मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का? मी मुलगा किंवा मुलगी पाहून मैत्री करत नाही. मला जी लोकं आपलीशी वाटतात त्यांच्याशी मी मैत्री करते. लोक काय म्हणतील या गोष्टीचा मला फरक पडत नाही. याबाबत आदित्य यांनीही अनेकदा दिशा आणि त्यांच्यात एक उत्तम मैत्री असल्याचे सांगितले.

जरी त्यांच्या या डिनरला डेटला जवळपास तीन वर्ष झाले असले तरी या किस्साची आठवण आजही ताजी आणि चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चर्चेनंतर दिशा आणि आदित्य कधीही एकत्र समोर दिसले नाही मात्र आजही चाहते त्यांची मैत्री बघण्यास उत्सूक आहे. त्यांना एकत्र बघण्यास चाहत्यांना उत्सूकता आहे.

Join our WhatsApp group