जगदीप धनखर देशाचे नवे उपराष्ट्रपती! मार्गारेट अल्वा यांचा केला पराभवदेशाला नवे राष्ट्रपती मिळाल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. आज देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे (NDA) उमेदवार माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत. तर विरोधी पक्षांनी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे जगदीप धनखड उपराष्ट्रपती होणार की मार्गारेट अल्वा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचे निकालही आजच सायंकाळपर्यंत जाहीर होतील. संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. नवे उपराष्ट्रपती हे 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील.

Join our WhatsApp group