ब्रेकींग: राज्यात दोन मोठे अपघात: ‘या’ महामार्गावर 5 जणांचा मृत्यू, तर रेल्वे अपघातात..

राज्यातील महामार्गांवर भीषण अपघात होण्याचं प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील पुणे-अहमदनगर महामार्गावर आज रात्री 1.30 वाजताच्या जवळपास मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये यात एका कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अहमदनगर येथे लग्नासाठी आलेले मृत्यू झालेले सर्व प्रवासी पनवेलला जात असताना हा अपघात घडला. अपघातग्रस्त इको कार रात्री दीड वाजता नगरमधून पुण्याच्या दिशेने जात होती. पुणे-अहमदनगर महामार्गावर पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर रात्री दीड वाजेच्या जवळपास हा भीषण अपघात (Accident on Pune Ahmednagar Highway) झाला आहे. कारमधील प्रवाशांचे म्हस्के आडनाव असल्याचं सांगण्यात येतंय.

रस्त्यावर उलट्या दिशेने ट्रक येत असताना त्या ट्रकला धावत्या कारने अचानक धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कारमध्ये असणारे अपघातग्रस्त प्रवासी हे एकाच कुटुंबातील होते. लग्न समारंभ आटोपून ते नगरहून पनवेलला जात असताना अपघात झाला. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये वय 14 वर्षे, 7 वर्षे आणि एक 4 वर्षांची चिमुकली यांचा समावेश आहे आणि इतर काही प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. संबंधित ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास चालू आहे. अपघातात पूर्णपणे चुक ही ट्रक चालकाची असून त्याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला असल्याचं सांगण्यात येतंय.

रेल्वेचा अपघात, 50 हून अधिक जण जखमी..

राज्यातील विदर्भातूनही भीषण अपघाताची एक बातमी समोर येत आहे. गोंदियामध्ये रायपुरहून नागपुरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनचा (Gondia Train Accident) अपघात झाला आहे. ही घटना आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली आहे. रायपूर-नागपूर भगत की कोठी ही ट्रेन गोंदिया येथून जात असताना मालगाडीला ट्रेनने धडक दिली. धडक झाल्यानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला आहे. या अपघातात 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत तर 13 प्रवाशांना मार लागला असून, जखमी प्रवाशांना जवळील जिल्हा सामान्य रूग्णालय आणि खासगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Join our WhatsApp group