सर्वसामान्य वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी; इंधन दरात मोठी कपात

इंधन दरवाढीनं पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी मोठी यासाठी, कारण CNG च्या दरात 6 रुपये प्रतिकिलो आणि PNG च्या दरात प्रतियुनिट 4 रुपयांची (fuel rate) कपात करण्यात आली आहे.

महानगर गॅस लिमिडेट कंपनीनं सर्वसामान्य ग्राहकांना हा मोठा दिलासा दिला असून आजपासूनच नवे दर लागू होत आहेत. अधिकृत माहितीनुसार PNG चे दर चार रुपयांनी कमी करुन 48.50 रुपये करण्यात आले आहेत.

CNG चे दर सहा रुपयांनी कमी झाल्यामुळं प्रतिकिलो 80 रुपये इतकं करण्यात आलं आहे. परिणामी सीएनजीचा वापर करणारे आता 48 टक्के आणि पीएनजीचा वापर करणारे 18 टक्के बचन करु शकणार आहेत. 37 रुपयांच्या दरवाढीनंतर महानगर गॅस लिमिटेडकडून सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा देण्यात आला आहे. नैसर्गिक वायुचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत असल्यामुळं दोन्ही इंधनांच्या दरात कपात करण्याचा निर्णय महागाईच्या झळा लागत असताना त्यावर कुंकर टाकणारा ठरत आहे.

Join our WhatsApp group