बोरगावात भंगार दुकान फोडून दहा लाखाचे साहित्य लंपास ; तपास गतिमान

ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी येथील जवळ असणाऱ्या बोरगाव श्री महालक्ष्मी स्क्रॅप मर्चेट हे भंगार दुकान फोडून सुमारे दहा लाखांहून अधिक स्क्रॅप चोरट्यानी लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानांमधील सीसी कॅमेरे तोडून हार्ड डिस्क गायब करून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले आहेत.


इतकी मोठी चोरीची घटना घडल्यामुळे बोरगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी की, बोरगाव सदलगा रस्तालगत प्रकाश गोसावी यांच्या मालकीचे श्री महालक्ष्मी स्क्रॅप मर्चेटचे मोठे दुकान आहे. या दुकानात लोखंड, अल्युमिनियम, तांबे, पितळ, गाड्यांचे मटेरियल असे मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप असते. काल शनिवारी रात्री प्रकाश गोसावी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले होते.सर्वत्र गणेश विसर्जनाचे वातावरण असल्याने या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी गोसावी यांच्या दुकानाच्या मागील बाजूस जाऊन कुलूप तोडून आत प्रवेश केला.आत प्रवेश करण्याआधी त्यांनी चारी ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीची तोडफोड केली. त्यानंतर दुकानातील महत्त्वाचे असलेले भंगार मधील तांबा, पितळ असे सुमारे पाच लाख किमतीचे एक टन गाड्यांचे पार्ट, ५० हजार हून अधिक किमतीचे अॅल्युमिनियम, नवीन भांडी, तीन शेळी आणि गाड्यांचे इंजिन, लोखंडी व भीड असे सुमारे दोन टन असे एकूण दहा ते बारा लाखाहून अधिक साहित्य सोडणे लंपास केले आहे. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एच. भरतगौडा व सहकारी भेट देऊन पंचनामा केला.

Join our WhatsApp group