आजपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधार, हवामान खात्याकडून ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी!

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपून काढले आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने (Meteorological Department) पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात (Coastal Region of South Odisha) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशामध्ये नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पुढचे तीन दिवस सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढेच चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आजपासून ते 15 सप्टेंबपर्यंत मुंबई-ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल.’ या पावसामुळे हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

राज्यात असा राहिल पाऊस –
– कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उर्वरीत महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

– पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

– मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

– कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

– मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

– आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

– नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठावाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Join our WhatsApp group