इचलकरंजी ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी


इचलकरंजी शहारालगत असणाऱ्या चंदुर व कबनूर गावामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांच्यावर खुनी हल्ला करण्याच्या प्रकार वाढले आहेत अशा आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे चंदुर व कबनूर गावातील समस्त भागातील नागरिक व राजकीय नेत्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून गावातील दारू अड्डे व गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा लोकांवर तडीपार करून कठोर कारवाई करावी ज्या ठिकाणी दारू सुरू अड्डे आहेत पोलिसांनी ते दारू अड्डे बंद करावे असे मागणीची निवेदन प्रांताधिकारी विकास खरात यांना देण्यात आले हा मोर्चा चंदुर येथून प्रांत कार्यालयावर काढण्यात आला.


इचलकरंजी शहालगत असणाऱ्या चंदुर कबनूर गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांच्यावर खुनी हल्ले करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करून विहिरीत टाकले होते त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कारवाई केली होती पण गेल्या चार दिवसांपूर्वी ऋतिक माणिक शिंदे याने चंदुर येथील राहणाऱ्या शाहूनगर परिसरातील एका आठ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला शेतात नेऊन अत्याचार करण्याचा प्रकार केला होता.

पण मुलीने आरडाओरडा करून आपली सुटका केली होती यावेळी त्या मुलाने तिच्याडोक्यात दगडाने मोठा वार केला होता ती गंभीर जखमी अवस्थेत बाहेर पळून आली त्यामुळे तिचे प्राण वाचले याची माहिती काही नागरिकांनी मिळतात त्या युवकाला नागरिकाने चांगला चोप देत शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन केली होते पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केला आहे चंदूर गावातील नागरिकांनी प्रांत कारल्यावर मोर्चा काढून झालेल्या प्रकारचा निषेध व्यक्त केला अशा नराधमांना फाशी ची शिक्षा द्यावी अशी मागणी केली तसेच चंदुर कबनूर गावामध्ये गांजा विक्री बेकायदेशीर चालू आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी मोर्चेकरांनी प्रांत अधिकारी व पोलिसांकडे केली यावेळी प्रांताधिकारी विकास खरात पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी व पोलिसांनी दिले आहे चंदुर व कबनूर गावातील जे बेकायदेशीर धंदे चालू असतील त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले तसेच बजरंग दल च्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी बेकायदेशीर धंदे बंद करण्याची मागणी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी ग्रामस्थ राजकीय नेते होते सरपंच सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत

Join our WhatsApp group