इचलकरंजी ; चंदुर गावातील अवैध धंदे बंद करावे अन्यथा मनसे स्टाईलने दारू अड्डे उध्वस्त केले जातील.

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी शहर मनसेच्या वतीने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना निवेदन देण्यात आले नराधमाना शिक्षा द्यावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली चंदुर परिसरातील अवैद्य धंदे बंद करावे अन्यथा मनसे स्टाईलने हे दारू अड्डे उध्वस्त केले जातील चंदुर व कबनूर भागामध्ये गांजाच्या मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे याकडे पोलीस दुर्लक्ष करत आहे पोलिसांनी अशा बेकायदेशीर अड्डे चालवणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याकडे केली आहे यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये अल्पमुलींवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होऊ लागले गेल्या काही वर्षापासून मुलींवर अत्याचार करून त्यांच्यावर खुनी हल्ला करून हत्या करण्याचे प्रकारात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत गेल्या चार दिवसांपूर्वी एका आठ वर्षाच्या मुलीला चॉकलेट देतो च्या बहाण्याने तिला शेतात घेऊन जाऊन त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी विरोध केला असता त्यावेळी डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले मुलींनी आरडाओरडा करताच भागातील नागरिकांनी त्या नराधमांकडून तिची सुटका केली व त्या आरोपीला चांगल्याच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याकडे केली आहे तसेच चंदुर गावातील जे बेकायदेशीर दारु अड्डे गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर मनसे स्टाईलने हे दारू अड्डे उध्वस्त केले जाईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिला यावेळी रवी गोंदकर प्रताप पाटील शहाजी भोसले महेश शेंडे आधी जण उपस्थित होते

Join our WhatsApp group