इचलकरंजी; धाडसी चोरी,सात तोळे दागिन्यांसह रोकड लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

खोतवाडी येथील पाण्याचे टाकी जवळील लोक मित्र कारखान्याजवळ राहणारे निवृत्त सैनिक विकास नारायण पायाळे यांच्या घरात कोणी नाही याचा फायदा घेत दिवसा चोरांनी कडी कोंडे उचकटुन आत मध्ये शिरून तिजोरी, कपाट फोडून त्यामध्ये असणारे सात तोळे सोन्याचे दागिने, पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याबाबतची फिर्याद पायाळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की खोतवाडी पाण्याच्या टाकीजवळ लोकमित्र कारखान्या शेजारी निवृत्त सैनिक विकास पायाळे राहतात सोमवारी सकाळी खोतवाडी येथे आठवडी बाजार असल्याने बाजारासाठी शोभा पायाळे बाजारासाठी गेल्या होत्या. दुपारी त्या घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आत घरामध्ये गेल्या असता तिजोरी, शोकेस, सर्व फर्निचर अस्ताव्यस्त पडले होते. तसेच दोन्ही खोलीमध्ये असणारे सोन्याचे दागिने हे लंपास केल्याचे त्यांना कळून आले. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी काही क्षणात घरामध्ये गर्दी केली होती.

सात तोळे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम . गेल्याचे घर मालकीण शोभा पायाळे यांनी सांगितले. घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी पाहणी करून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला सदर घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या महिन्यातील खोतवाडी परिसरातील चौथ्या चोरीचे प्रकरण असल्याने या भागातीलच चोर असावेत अशी घटनास्थळी नागरिकांची चर्चा होती.

Join our WhatsApp group