आता गाय-म्हशींचेही बनणार आधार कार्ड, मोदींची मोठी घोषणा..

भारतात आधार कार्ड(Aadhaar Card) म्हटलं की नोकरी असो सिम कार्ड बहुदा प्रत्येक वेळी उपयोग होणारं समजलं जातं. आधार कार्डचा वापर केल्याने आपल्याला स्वतःविषयी खूप काही माहिती समजू शकते. पण तुम्ही माणसाचं आधार कार्ड पाहिलं असेल पण आता गाय-म्हशींसारख्या दूध देणाऱ्या प्राण्यांचेदेखील आधार कार्ड बनणार अशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (ता. 12 सप्टेंबर) रोजी आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मोदींनी सर्व दुग्धजन्य प्राण्यांचे आधार कार्ड बनवणार असल्याचं म्हटलं आहे. भारतात दूध व्यवसायाची भरभराट झाली आहे. भारतामधील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून हे क्षेत्र अधिक विस्तारत आहे. भारतात जेवढे दूध देणारे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा खूप मोठा डाटाबेस तयार करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. डेअरी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक जनावराला टॅग केले जात असल्याचंही मोदी म्हणाले.

आपल्याला माहीती आहे की, ज्याप्रमाणे माणसांचं आधार कार्ड बनवताना बायोमेट्रिक माहीती जसे की बोटांचे ठसे, डोळे अशी माहीती दिली जाते. तसेच आता प्राण्यांची बायोमेट्रिक माहीती घेतली जाणार आहे. यामुळे प्राण्यांना एक विशेष ओळख, दर्जा प्राप्त होईल. या मोहिमेस पशु आधार (Pashu Aadhaar) असं नाव देण्यात आलं आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जनावरांचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल याकडे लक्ष देऊन दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ वाढण्यास मदत होणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितला एक किस्सा..

महाराष्ट्राशेजारील गुजरात राज्यात जाफराबादी, मुऱ्हा सुरती, म्हैसाना, अशा काही प्रजातीच्या म्हशी प्रसिद्ध आहेत. तसेच गुजरातच्या कच्छमध्ये ‘बन्नी’ म्हशीची प्रजाती प्रसिद्ध आहे. मोदी एक किस्सा सांगत म्हणाले की, “ही म्हैस रात्री चरते आणि दिवसा गोठ्यात राहते. चरण्यासाठी ती गोठ्यापासून जवळपास 15 ते 17 किमी अंतर फिरते. यानंतर दिवस उजाडताच ती परत गोठ्याकडे वाट न चुकता माघारी येते. असा दिनक्रम होत असल्याने सहाजिकच बन्नी म्हैस गोठा किंवा रस्ता चुकल्याचे खूप कमी ऐकू येते. लोकांना एक गोष्ट ऐकून धक्का बसेल की ही म्हैस जेव्हा चरायला जाते तेव्हा तिचा मालक किंवा गुराखी त्यांच्यासोबत नसतो. वाळवंटात पाणी कमी असते तरीही त्या पाण्यातही तिचं भागतं”, असे मोदी म्हणाले.

Join our WhatsApp group