तुमच्याही घरात कन्या असेल तर बँक खात्यावर येतील 15000 रुपये, जाणून घ्या प्रोसेस…

आपण अत्याधुनिक युगात वावरत असलो तरी ग्रामीण भागात (Gramin Bharat) कन्या म्हणजेच मुलींबाबत (my daughter) नकारात्मक विचारसरणीमुळे त्यांना आरोग्य (Health), शिक्षणासारख्या (Education) मूलभूत अधिकारांपासून नेहमीच वंचित ठेवले जाते. हे संपवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने (Yogi Sarkar) मुलींना त्यांचा मुलभूत अधिकार (childrens rights) मिळवून देण्याच्या दृष्टीकोणातून ‘कन्या सुमंगला योजना’ (Kanya Sumangala Yojana) तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकारकडून 15000 रुपये आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जाणून घ्या काय आहे नेमकी ही योजना? (Kanya Sumangala Yojana)
उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मुलींसाठी ‘कन्या सुमंगला योजना’ (Kanya Sumangla Yojana) आणली आहे. या योजनेंतर्गंत मुलींच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी 15000 रुपये राज्य सरकारतर्फे दिले जातील. या योजनेचा लाभ केवळ उत्तर प्रदेशात जन्मलेल्या मुलींनाच मिळेल.

किती रुपयांचा लाभ?


योगी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘कन्या सुमंगला योजना’ (Kanya Sumangla Yojana) अंतर्गत मुलीला 15000 रुपयांलाचा लाभ मिळेल. एकूण 6 हप्त्यांमध्ये 15000 रुपये बॅंक खात्यात राज्य सरकारतर्फे जमा करण्यात येतील. या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://mksy.up.gov.in/women_welfare/index.php

वर भेट देऊ शकतात.

कोणत्या मुलींना घेता येईल लाभ?


उत्तर प्रदेश सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 6 श्रेणीत विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

  1. मुलीचा जन्म होताच पहिला हप्ता 2000 रुपये मिळतील.
  2. मुलगी एक वर्षाची झाल्यानंतर दूसरा हप्ता 1000 रुपये मिळेल.
  3. पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर तिसरा हप्ता 2000 रुपये मिळतील.
  4. सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर चौथा हप्ता 2000 रुपये मिळतील.
  5. नवव्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर पाचवा हप्ता 3000 रुपये मिळतील.
  6. 10 वी आणि 12 वीची परीक्षा उत्तीर् झाल्यानंतर पदवी किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर सहावा हप्ता 5000 रुपये मिळतील.

जाणून घ्या कोणत्या नागरिकांना मिळेल लाभ?


– एक एप्रिल 2019 आधी ज्या मुलींचा जन्म झालेला असावा.
– मुलीचे आई-वडील उत्तर प्रदेशातील रहिवासी असावे.
– आवश्यक दस्ताऐवज – रेशन कार्ड/ आधार कार्ड/ मतदान कार्ड/ इलेक्ट्रिसिटी बिल आवश्यक.
– मुलीच्या वडीलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असावे.
– एका कुटुंबातील केवळ दोन मुलांनाच या योजनेला लाभ घेता येईल.
– परंतु एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असेल तर तिसऱ्या कन्येला या योजनेचा लाभ घेता येईल.

Join our WhatsApp group