इचलकरंजी ; साहेब उपाशी मारू नका : माकप रस्त्यावर

साहेब आधीच हाताला काम नाही, महागाई पेटली आहे, करावर कर वाढत चालला आहे, घरात वृद्धांचे आजार पण आहे, मुला बाळांचे शिक्षण आहे, आणि रोज वाढणाऱ्या महागाईने कंबर तुटले आहे… साहेब अक्षरशः आम्ही आता टाचा खोडून मरतोय.. त्यात आता रेशनचे धान्य बंद होणार असल्याने आम्ही आता पोटाला काय खाऊ.. त्यामुळे साहेब आम्हाला उपाशी मारू नका अशा काहीशा भावना घेऊन आज माकप शहरातील महिला व कामगारांसह रस्त्यावर उतरला.

इचलकरंजी शहरामध्ये भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने रेशनवरील धान्याचा अधिकार सोडणे बाबतचा आदेश रद्द करावा याबाबत आज पुरवठा कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.यावेळी शहरातील महिला व कामगार वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.


महाराष्ट्र शासनाने दि . ०१.० ९ .२०२२ रोजी पुरवटा उपायुक्त पुणे यांच्यामार्फत एक आदेश काढून ज्यांचेकडे दोन चाकी वाहन आहे , तीन चाकी वाहन आहे अथवा चार चाकी वाहन आहे . तसेच ज्यांचे उत्पन्न ५ ९ हजार रुपया पेक्षा जास्त आहे , तसेच ज्यांचे स्लॅबचे घर आहे . ज्यांची इन्कमटॅक्स फाईल आहे अशा कुटुंबानी रेशनवरील धान्याचा अधिकार सोडावा असा आदेश काढला आहे . हा आदेश श्रीमंतासाठी नसून या आधुनिक काळातील गरीब , विरोधीच आहे याचा आंम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहिर निषेध करीत आहोत . आजच्या काळात दोन चाकी वाहन हे जगण्याचे महत्वाचे साधन झाले आहे . कामावर जाणसाठी , वैरण आणणेसाठी वगैरे सर्वच कामासाठी त्याचा वापर वाढला आहे . याचा अर्थ ते कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वर आले असा होत नाही . तीन चाकी रिक्षा चालकांची काय कमाई आहे , या तीन चाकी साधनामुळे त्याला जगताही येत नाही आणि मरताही येत नाही . तसेच जी भाड्याची चार चाकी वाहने आहेत त्यांना बँकचे हप्ते भरणे ही कठीण होत आहे.आज इचलकरंजी शहर परिसरामध्ये अंत्योदयाची ४८०० , बीपीएल व प्राधान्य कुटुंबे ३०००. पांढरी ४२०० तर केशरी कार्डधारक ४० हजार आहेत . असे अंदोजे ९ ० ते ९ ५ हजर कार्डधारक आहेत . त्यामध्ये मा . त्रिगुण कुलकर्णी यांचा आदेश लागू झाल्यानंतर सर्वांचेच रेशनवरील धान्य बंद होणार आहे . काही लोक रेशनवरील धान्य विकतात , कांही लोक जनावरांना घालतात त्याचा विपर्यासकरुन धान्यच बंद करण्याचा डाव राज्य आणि केंद्र सरकार करीत आहे . हा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी आणि धान्य मिळण्याची उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपये करावी व आहे त्या सर्वांचे रेशन चालू ठेवणे बरोबरच खालील मागण्या करीत आहोत .

धान्य मिळणे बाबतची उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपये केली पाहिजे . दि . ०१.० ९ .२०२२ इ . चा अप्पर पुरवटा उपायुक्त , पूणे श्री . त्रिगुण कुलकर्णी यांचा आदेश रद्द करावा . पूर्वीप्रमाणे सर्वांचे धान्य पूर्ववत सुरु राहीले पाहिजे . केशरी कार्डधारकांना रेशनवरील धान्य मिळाले पाहिजे . शहर व तालुवयातील सर्व अतिक्रमणे कायम करा . शहर व तालुक्यातील पूरग्रस्तांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करा . रंशन मधील प्रशासकीय भ्रष्टाचार बंद करा .आमच्या मागण्याच्या निर्णय २० सप्टेंबर नाही झाला तर जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालावा लागेल यामोर्चाला भारमा कांबळे भाऊसाहेब कसबे दत्ता माने सदा मलाबादे जीवन कोळी पार्वती म्हेत्रे आदीजण उपस्थित होते

Join our WhatsApp group