इचलकरंजी पाणी योजनेला विरोध वाढला

दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सुळकुड पाणी योजनेला नागरिकांचा विरोध वाढला आहे. इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध करण्यासाठी शेतकरी व नागरिकांच्यावतीने सोमवारी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

दरम्यान, प्रस्तावित १५६ कोटीच्या सुळकुड पाणी योजनेला विरोध वाढला असून या विरोधात सुळकूडसह पंचक्रोशीतील गाव एकवटली आहेत. यावेळी नागरिकांनी प्रस्तावित योजनेच्या प्रतीकात्मक शासन आदेशाची होळी करत इचलकरंजी शहराला पाणी न देण्याचा निर्धज दुधगंगा बचाव समितीने केला आहे. त्यामुळे सुळकुड पाणी योजना मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत.

Join our WhatsApp group