PM मोदींच्या वाढदिवशी ‘या’ रुग्णालयात जन्मलेल्या बालकांना मिळणार सोन्याची अंगठी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे (PM Modi Birthday Program) आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः भाजपतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तामिळनाडू युनिटतर्फे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी (Gold Ring) देण्यात येणार आहे. यासह पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 720 किलो मासे वाटपाचा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन (L Murugan) यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाविषयी माहिती देतांना डॉ. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपने चेन्नईतील RSRM हॉस्पिटलची निवड केली असून येथे 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या सर्व मुलांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाईल, प्रत्येक अंगठीची किंमत सुमारे 5000 रुपये असू शकते. त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मासे वाटप


याशिवाय केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्र्यांनी पीएम मोदींच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 720 किलो मासे वाटपाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. मंत्री मुरुगन म्हणाले की, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोलाथूरमध्ये पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मासे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश मत्स व्यवसायाला चालना मिळावी तसेच लोकांना माशांचा आरोग्याला होणार फायदे कळावे हा आहे.

यावेळी भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वाढदिवस विशेष स्वरूपात साजरा करणार आहे. दरम्यान, 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. या दिवसापासून 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपर्यंत भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपातर्फे देण्यात आली आहे.

Join our WhatsApp group