लंपीबाधित जनावरांवर औषधांचा खर्च शासनाकडून होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा..

देशात जनावरांमध्ये पसरत असलेल्या लंपी रोगाने आता महाराष्ट्रात सुद्धा आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता सरकारला या कारणाने विरोधकांनी घेरलं असता शिंदे-फडणवीस सरकारने मोठ्या वेगाने कामे करायला सुरुवात केली आहे. संभाजीनगरमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काही घोषणा आणि काही अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहीतीनुसार..

दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे त्या ठिकाणाहून सध्या 5 किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे. जनावरांच्या लम्पी स्कीन आजारासंदर्भात नियमित आढावा घेऊन उपाययोजना आणि शिफारस करण्याचे काम करण्यासाठी
टास्क फोर्सची स्थापना करण्याचे आदेश मुख्यमंत्री दिले.

राज्यात लंपी आजारामुळे आता जनावरांच्या विलगीकरणाचा विचार सरकार करत असल्याने बाधित जनावरे वाढू नये यासाठी क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय
आयुक्त आणि जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी त्यांची विमानतळावर भेट घेतली असता यासंदर्भात मागणी केली होती.

लंपी आजारावर लस उपलब्ध केली असून आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दररोज हजारो जनावरांना लसी देण्यात येत आहे. तरीही ज्यांची जनावरे मृत्युमुखी पडली त्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे राज्य सरकार मदत करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जनावरांना क्वारंटाईन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे..?

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी आढावा बैठक घेतली, त्यात लम्पीबाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यासाठी एका आठवड्यात 50 लाख लसमात्रा उपलब्ध होणार आहेत. रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

Join our WhatsApp group