इचलकरंजीत अतिक्रमण मोहीम तीव्र ; अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार ; आयुक्त सुधाकर देशमुख

इचलकरंजी शहरामध्ये पुन्हा अतिक्रमण मोहीम तीव्र करण्यात आली महापालिकेच्या आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण ची पाहणी केल व अतिक्रमण करणाऱ्यांना सज्जड दम ही दिला महापालिकेच्या रस्त्यांवर बोर्ड लावले आहेत.

दुकाने मांडले आहेत त्यांच्या वर कारवाई करण्यात आली या अतिक्रम मोहीमची आज आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली होती याची दखल घेऊन आज धान्य ओळ परिसरातील संपूर्ण पत्रे काढण्यात आले गांधी पुतळा जनता बँक चौक थोरात चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अतिक्रमण काढण्यात आले आले तसेच वखार भाग परिसर मध्ये वाहन विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग केली होती व विक्रीसाठी ठेवली होती महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने ही सुद्धा वाहने ताब्यात घेतली आहे तसेच शहर अतिक्रमण मुक्त करणार असा पवित्रा सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे.


इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार घेतला आहे इचलकरंजी शहरामधील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे इचलकरंजी शहर स्वच्छ सुंदर दिसले पाहिजे या उद्देशाने सुधाकर देशमुख यांनी आज पुन्हा शहरांमध्ये रस्त्यावर फुटपात वर जे जे नागरिक अतिक्रमण करत आहेत या अतिक्रमण काढण्यास अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांना आदेश दिले होते.

याची दखल घेऊन आज अतिक्रम पथकाने धान्य ओळ मध्ये असणारे धान्य दुकानदारांची ही फुटपट्टीवर अतिक्रमण केल्याचे सर्व पत्रेही काढण्यात आले यावेळी काही काळ अधिकारी व दुकानदार यांच्यात वादावादीचा प्रकार घडला यावेळी माजी नगरसेवक अमरजीत जाधव यांनी अधिकाऱ्यांची बोलण्याचा प्रयत्न केला पण अधिकाऱ्यांनी कोणालाही न जुमानता ही अतिक्रमण ककारवाई सुरू ठेवली गांधी पुतळा जनता बँक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक थोरात चौक तसेच आदी भागातील फुटपाटीवर लावणारे डिजिटल बोर्ड तसेच वखार भाग परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहन विक्रेत्यांनी वाहणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली होती.

त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत होता तसेच नगरपालिकेच्या जागेमध्ये सुद्धा काहीनी अतिक्रमण केले होते हे अतिक्रमण काढण्यात आली जे नागरिक अतिक्रमण करतील त्यांच्यावर फौजदार स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे इथून पुढे कोणीही अतिक्रमण करू नये जे करतील त्यांचे सर्व साहित्य जप्त केले जाईल असा आदेशही दिला आयुक्त सुधाकर देशमुख स्वतः रस्त्यावर उतरून आज अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत पाहणी करून अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले आहेत या करावी मध्ये आयुक्त सुधाकर देशमुख विजय राजापुरे संजू शेटे सुभाष आवळे सुनील संगेवार संजय कांबळे व आदी अधिकारी व शंभरहून अधिक अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते

Join our WhatsApp group