इचलकरंजी शहरात दुर्गामाता दौडची सांगता

इचलकरंजी शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने गेली १५ वर्षापासून दुर्गामाता दौड हि नवरात्री काळात नऊ दिवस घेतली जाते काल या दौडची सांगता करण्यात आली .


इचलकरंजी शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने दुर्गा माता दौड चे आयोजन केले जाते शहरातील प्रत्येक भागातून धारकरी येत असतात सकाळी ५.३० वाजता के एल मलाबादे चौकापासून या दौडला सुरवात होते यामध्ये मुला मुलींकडून भगवा ध्वज तलवारी यांची पूजा करून शहरातील विविध भागातून हि दौड काढली जाते भगवे फेटे पांढरा पोशाख परिधान करतात.

यामध्ये प्रत्येक भागात असणाऱ्या देवीचे दर्शन घेऊन हिंदू एकात्मतेचा प्रचार केला जातो यामध्ये राष्ट्रकार्य चे काम हिंदू धर्माबद्दल माहिती दिली जाते ज्या भागातून हि दौड जाते त्याभागातील नागरिक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात यामध्ये जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज कि जय संभाजी महाराज कि जय अश्या घोषणा देत हि दौड पुढे जात असते आज शहरातील विविध भागात संपन्न झाली हि दौड सकाळी ५.३० वाजता के एल मलाबादे चौकातून चालू होऊन वेगवेगळ्या भागातून जाऊन येऊन परत 10 वाजता के एल मलाबादे चौकात सांगता करण्यात आली.

यावेळी महाजन गुरुजींनी हिंदू धर्मा विषयी प्रबोधन केले या दौडला शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला या दौड ला शहरातील 10 हजार धारकरी उपस्थित होते या दौडचे ध्वज पूजन स्वप्नील आवाडे महाजन गुरुजी पत्रकार साईनाथ जाधव नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ही दौड शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली.

Join our WhatsApp group