इचलकरंजी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्धरित्या संचलन

इचलकरंजी शहरात दसरा महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शिस्तबद्धरित्या संचलन करण्यात आले. शहरातील मुख्यमार्गासह ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. संचलन पाहण्यासाठी नागरीकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.


इचलकरंजीत दसरा महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने दरवर्षी संचलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी शहरातील बोहरा मार्केट, महात्मा गांधी पुतळा, तांबे माळ, विक्रमनगर, नामदेव मैदान अशा विविध चार भागांतून संचलनास ध्वजपूजन व प्रार्थनेने प्रारंभ झाला. तर शिवतीर्थ येथून घोषा सह संचलनाचे महात्मा गांधी पुतळा येथे एकत्रीकरण करण्यात आले.

संचलनाच्या मध्यभागी भगव्या ध्वजाचे पथक तर त्यापाठोपाठ शिस्तबद्ध चाललेले स्वयंसेवक आणि छत्रपती शिवाजी महाराज, प्रथम संघचालक डॉ. केशव हेडगेवार, द्वितीय संघचालक माधव गोळवलकर यांच्या प्रतिमा असलेली जीप व घोष पथक यांचा समावेश होता. संचलन मार्गावर अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. संचलन दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आणि याचपद्धतीने संचलन मार्गावर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटना आणि नागरीकांच्यावतीनेही पुष्पवृष्टी स्वागत करण्यात आले. पुढे ही फेरी मुख्यमार्गावरून झेंडा चौक मार्गे नामदेव मैदानावर पोहचल्यावर सांगता झाली. संचलन पाहण्यासाठी नागरीकांनीही रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

Join our WhatsApp group