सैन्याचं हेलिकॉप्टरअरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलं

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी बचाव पथक रवाना झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सियांग जिल्ह्यातील तुतिंय मुख्यालयापासून 25 किलोमिटर दूर अंतरावर असलेल्या सिंगिंग गावामध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेलं हेलिकॉप्टर एडवान्स लाईट आर्मी हेलिकॉप्टर होतं. या हेलिकॉप्टरमध्ये दोघेजण होते. हेलिकॉप्टर राज्यातून बाहेर येत असताना ही दुर्घटना घडली. सकाळी साधारण 10.40 वाजण्याच्या सुमारास हा हेलिकॉप्टर अपघात घडला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. चीनच्या सीमेपासून 35 किलोमीटर अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं होतं असल्याचे सांगितले जात आहे.

अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. याच महिन्याच्या सुरुवातीलाही अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातात ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट जखमी झाला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी, केदारनाथ येथे हेलीकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

Join our WhatsApp group