मोठी घोषणा, आरोग्य विभागात होणार 10000 पदांची भरती

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्तवाची बातमी आहे. राज्यात लवकरच आरोग्य विभागात मेगाभरती होणार आहे. या भरती अंतर्गत 10 हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांच्या घोषणेमुळे मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. या भरतीची जाहिरात 1 ते 7 जानेवारीदरम्यान प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर परीक्षा आणि मुलाखतीचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे देखील गिरीश महाजन यांना सांगितलं. इतकंच नाही तर पुढील वर्षी एप्रिलपर्यंत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या हातात नियुक्ती पत्र असेल, अशी हमी देखील यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे.गिरीश महाजन म्हणाले, आरोग्य विभागात मार्च 2018 मध्ये अशी मेगाभरती करण्यात आली होती. या भरती सुमारे 13 हजार पदे भरण्यात आली होती. आता देखील राज्यात 10127 पदे भरली जाणार आहेत.

Join our WhatsApp group