संजय राऊतांसह अनिल देशमुखांची यंदाची दिवाळी तुरुंगातच, जामीन अर्ज फेटाळला!


ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झाला होता. मात्र सीबीआयकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांना तुरुंगातच राहावे लागले होते. या प्रकरणातही जामीन मिळावा यासाठी देशमुखांनी याचिका दाखल केली होती. मात्र सीबीआयच्या विशेष कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांची यंदाची दिवाळी ही तुरुंगातच जाणार आहे. यासोबतच शिवसेना नेते संजय राऊतांनाही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कारण राऊतांच्या कोठडीमध्ये कोर्टाकडून वाढ करण्यात आली आहे. या खटल्यावरील पुढील सुनावणी ही 2 नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने त्यांना अटक केलेली आहे. जुलै महिन्यापासून ते तुरुंगात आहेत.देशमुखांचा अर्ज फेटाळला
अनिल देशमुखांना ईडीकडून जामीन मंजूर झाला होता. मात्र सीबीआयच्या प्रकरणामध्ये त्यांना जामीन मिळालेला नव्हता. या जामिनासाठी अनिल देशमुखांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर सेशन कोर्टाने शुक्रवारी सुनावणी केली. मात्र यामध्ये त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. ईडीच्या प्रकरणामध्ये त्यांना जामीन मिळाल्यानंतर सीबीआय प्रकरणात जामीन मिळावी अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र न्यायालयाने त्यांना कोणताच दिलासा दिलेला नाही. या निर्णयानंतर आता अनिल देशमुख हे मुंबई हाय कोर्टामध्ये धाव घेऊ शकतात. त्यांच्यावर मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कथित 100 कोटी वसुलीच्या घोटाळ्यामुळे ते अडचणीत सापडलेले आहेत.

Join our WhatsApp group