शिवाजी पार्कवर ‘महायुती’चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज ठाकरे एकाच मंचावर, चर्चांना उधाण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. यातच, आज मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. या मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली.मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमात प्रथमच मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने, आता राज्यातील राजकीय वर्तुळात भाजप-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मनसेच्या वतीने दिपावलीनिमित्त गेल्या १० वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

Join our WhatsApp group