यंदाच्या दिवाळी बाजारातून ८० टक्के चीनी माल गायब

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा मोकळ्या वातावरणात साजरी होत असलेल्या दिवाळीसाठी देशभरातील बाजार सजले आहेत. विविध वस्तूंच्या गर्दीने भरलेल्या यंदाच्या बाजाराचे वैशिष्ट म्हणजे यंदा चीनी माल बाजारातून जवळजवळ अदृश्य झाला आहे. चीनी मालाचे प्रमाण यावेळी सुमारे ८० टक्के कमी झाले असून स्वदेशी मालाने बाजारपेठ भरून गेल्या आहेत. गेले दोन वर्षे करोना मुळे नुकसान सोसावे लागलेला व्यापारी वर्ग यंदा चांगल्या व्यवसायाची अपेक्षा करत आहे.दिवाळी मध्ये घर सजावटीचे सामान, दिवे पणत्या, आकाशकंदील, लाईट माळा, फुले माळा, मूर्ती अश्या अनेक वस्तूंना मागणी असते. गेली अनेक वर्षे चीनचा स्वस्त माल बाजारात मोठ्या प्रमाणावर विकला जात होता. चीनी माल टिकवू नसला तरी स्वस्त किमती मुळे त्याला मागणी होती. पण आता मात्र स्वदेशी टिकावू वस्तूंना मागणी वाढली असून त्यांच्याही किंमती सहज परवडणार्या आहेत असे दुकानदारांचे म्हणणे आहे. स्वदेशी पाण्यावर जळणारे दिवे, फुलपाखरे माळा, चांदणी माळा यांना अधिक मागणी आहे. डेकोरेशन साठी लाईट आणि अन्य वस्तूंवर विशेष ऑफर दिल्या जात आहेत. ऑनलाईन खरेदी आणि मॉल यांच्यामुळे बाजारात प्रत्यक्ष ग्राहक कमी दिसत आहेत. पण खरेदीला येणारा ग्राहक आवर्जून भारतीय वस्तूंची मागणी करताना दिसतो आहे असे सांगितले जात आहे.


Join our WhatsApp group