इचलकरंजी ; रस्त्यावर व्यवसायासाठी बसू न दिल्याने छोट्या विक्रेत्यांचे ठिय्या आंदोलन ; बैठकी नंतर परवानगी मिळाली पण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

स्त्यावर व्यवसायासाठी बसू न दिल्याच्या कारणावरून संतप्त छोट्या विक्रेत्यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास के. एल. मलाबादे चौकात अचानक रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
महानगरपालिका प्रशासन रस्त्यावर न बसण्याचा पवित्रा घेतला. विक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय मांडण्याची आग्रही भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर -पोलीस व महापालिका प्रशासनाच्या बैठकीनंतर अटी शर्तीसह रस्त्यावर व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली. त्यांनतर प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करत व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान पुढील तीन दिवस मुख्यमार्गावर रुग्णवाहिका, अग्निशामक दल त्यासह पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.


इचलकरंजी शहरामध्ये दिवाळी सणावेळी महात्मा गांधी पुतळा चौक ते शिवतीर्थ पर्यंत छोट्या विक्रे त्यांना व्यवसायासाठी परवानगी दिली जाते. मात्र यंदा महानगरपालिकेचे

व्यापार करण्यास परवानगी
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रस्त्याच्या दुतर्फा छोट्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी परवानगी दिली होती. रस्त्याच्यामध्ये व्यवसायासाठी बसत असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो तसेच एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशामक दल अथवा रूग्णवाहिका येण्याजाण्यास अडचणी येतात. तसेच गेल्यावर्षी बाजारपेठेतच मोठी आग लागल्याने मोठा अनर्थ घडला होता. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. मात्र आज शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अनेक छोटे व्यावसायिक रस्त्यावर ताडपत्री व इतर साहित्य ठेवून व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करीत असताना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या छोट्या व्यावसायिकांनी एकत्र जमून येथील मलाबादे चौकात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची माहिती कळताच शिवाजीनगर, गावभाग, शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते भूमिकेवर ठाम राहिले.

त्यानंतर महापालिका व पोलीस प्रशासनाची याबाबत बैठक झाली. या बैठकीत अटी शर्तीसह रस्त्यावर व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली. बाजाराच्या ठिकाणी रस्त्यावर केवळ बसून व्यापार करण्यास मुभा दिली. कोणत्याही प्रकारचा मंडप अथवा टेबल, छत उभारण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. अशा प्रकारचा व्यापार आढळल्यास अतिक्रमण विभाग कारवाई करणार आहे. दरम्यान बाजार मार्गावर तीन ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणार आहे. शिवतीर्थ चौक मलाबादे चौक तसेच गांधी चौक या ठिकाणी रुग्णवाहिकेसह अग्निशामक दल सज्ज असेल तसेच पोलीस बंदोबस्तही असणार आहे.

Join our WhatsApp group