गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांनी वाढवले!

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असणारी मुंबईची लोकल हे सर्वांच्या प्रवासाचे उत्तम साधन आहे. लोकलमध्ये कामाला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशामध्ये सध्या दिवाळी सण असल्यामुळे खरेदीसाठी मुंबईकर घराबाहेर पडत आहे. बाजारपेठांसोबत मुंबईतील लोकल आणि रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याचसोबत दिवाळीनिमित्त आपल्या गावाकडे जाणारे प्रवासी आणि मुंबईत येणारे प्रवासी यांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकांवरील ही वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरामध्ये 50 रुपये केले आहे.

मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरामध्ये वाढ केली आहे. ही वाढ मध्य रेल्वे मार्गावरी काही महत्वाच्या स्थानकांसाठी आणि तात्पुरत्या स्वरुपाची असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. ट्वीट करुन मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे. 22 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर यादरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 50 रुपये असणार असल्याचे मध्य रेल्वे सांगितले आहे.

मध्य रेल्वने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची जास्त गर्दी टाळण्यासाठी या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दर 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर (तात्पुरता उपाय म्हणून) 50 रुपये करण्यात आले आहे.’ दिवाळीनिमित्त होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी काहिशी प्रमाणात कमी होईल.

Join our WhatsApp group