इचलकरंजी : इंदिरा गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना भेटवस्तू वाटप

इचलकरंजी येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य रस्त्यावर पूर्व व पश्चिम दिशेला दोन प्रवेश कमानी बसविणे, प्रत्येक गल्लीमध्ये भुखंड नंबरचे फलक लावणे व मंगल कार्यालय नूतनीकरण करणेचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती, चेअरमन दिलीप झोळ यानी दिली. संस्थेने सन २०२२-२३ या वर्षा साठी प्रत्येक सभासदांना लाभांश रुपात दोन चादरी भेटवस्तू म्हणून दिल्या. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जेष्ठ सभासद सुधाकरराव मणेरे प्रमुख उपस्थित होते.

माजी चेअरमन पांडुरंग राजमाने यानी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी चेअरमन दिलीप झोळ यानी यापुर्वी देण्यात आलेल्या भेटवस्तू व संस्थेत झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यानंतर सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते सभासद राजाराम पोवार तसेच चेअरमन झोळ व उपस्थित संचालक यांच्या हस्ते सभासदाना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी संचालक अनिल कुलकर्णी, रियाज जमादार,  धनंजय गोरे, आप्पासो कुंभार, मारुती वाशीकर, सचिव शिवय्या जंगम आदि उपस्थित होते. संचालक अशोक वसगडे यानी सुत्रसंचलन केले. विक्रांत दानोळीकर यानी आभार मानले.

इंदिरा गृहनिर्माण संस्था जिल्ह्यातील एकमेव आय. एस्. ओ. मानांकीत गृहनिर्माण संस्था आहे. संस्थेने सभासदांना प्रत्येक वर्षी संसारोपयोगी व चांगल्या वस्तू भेट दिल्या आहेत. यावर्षीही भेटवस्तू देत ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याबरोबर सभासदाना आणखीन चांगल्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
दिलीप झोळ-चेअरमन.

Join our WhatsApp group