OYO रूम्समध्ये CCTV लावून कपल्सना करायचे Blackmail,पोलिसांनी असा केला गँगचा पर्दाफाश

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गेल्या काही वर्षापासून ओयो रूम्स (OYO Rooms) वापरण्याचे प्रमाण वाढलं आहे. अनेक कपल्स एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी ओयो रूमचा वापर करतात.मात्र अशाप्रकारचे रूम्स घेऊन वेळ घालवणे अनेक कपल्सना महागात पडले आहे. कारण काही कपल्सना ब्लॅकमेलिंगचा (Blackmail) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत कपल्सनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हॉटेलचे रूम बूक करायचे, त्यानंतर रूममध्ये जाऊन ते सीसीटीव्ही (CCTV) लावायचे. हे सीसीटीव्ही लावल्यानंतर ते रूम सोडायचे. यानंतर याचं रुममध्ये येणाऱ्या कपल्सचे ते अश्लील व्हिडिओ बनवायचे. साधारण प्रत्येक घटनेआधी हे आरोपी अशाप्रकारे सीसीटीव्ही लावून कपल्सची रूममधील अश्लील कृत्य सीसीटीव्हीत कैद करायचे.

आरोपी रूम्समध्ये सीसीटीव्ही (CCTV) लावून कपल्सचे ते कृत्य सीसीटीव्हीत कैद करायचे. त्यानंतर आरोपी सीसीटीव्ही लावलेला तोच रूम बूक करून सीसीटीव्ही काढायचे आणि त्यातल्या व्हिडिओ फूटेज ताब्यात घ्यायचे. या व्हिडिओ फूटेजवरून कपल्सना ब्लॅकमेल करायचे आणि कपल्सने विरोध केल्यास त्यांना व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. विशेष म्हणजे आरोपींच्या या कृत्याची ओयो मालकांना काही एक कल्पना नव्हती.

आरोपी OLX वर आयफोनच्या जाहिराती देऊन ग्राहकांना कमी किमतीत विकण्याचे आमिष दाखवून लूटायचे. गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सर्रास सुरु होता. यात आरोपीने असंख्य ग्राहकांना लुबाडत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

Join our WhatsApp group