75 हजार तरुणांना नोकरी मिळाली, पण कोणती पदं मिळणार?, घ्या जाणून अधिक माहिती!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 75 हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर दिले दिवाळीनिमित्त स्पेशल गिफ्ट दिले. आज पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घानटन करण्यात आले. केंद्र सरकारच्या 10 लाख पदांच्या भरतीसाठी हा रोजगार मेळावा सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75 हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेडर दिले खरे पण या तरुणांची नेमकी कोणत्या पदावर भरती केली जाणार आहे, ही भरती प्रक्रिया कोणामार्फत राबवण्यात आली आहे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आज आपण हेच जाणून घेणार आहत की, अपॉइंटमेंट लेटर मिळालेल्या तरुणांना कुठे नोकरी मिळणार आहे.तरुणांना कोणती पदं मिळणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या 75 हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर दिले त्या तरुणांची पोस्टिंग देशातील 38 मंत्रालयांमध्ये किंवा त्यांच्या विभागांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर होणार आहे. या तरुणांना गट अ आणि ब (राजपत्रित), गट ब (अराजपत्रित) आणि गट क अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मंत्रालय किंवा त्यांच्या विभागामध्ये नोकरी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, या तरुणांना ज्या पदांवर नोकरी मिळणार आहे या पदांमध्ये केंद्रीय सशस्त्र दलांव्यतिरिक्त उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) यांचा समावेश असणार आहे.

कोण करणार तरुणांची भरती?
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या विविध मंत्रालयांनी आणि विभागांनी या तरुणांची भरती केली आहे. या व्यतिरिक्त युनियम लोकसेवा आयोग (UPSC), कर्मचारी निवड आयोग (SSC), रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) सारख्या एजन्सीच्या मदतीने मिशन मोडमध्ये भरती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात मिशन मोडवर 10 लाख तरुणांची भरती करण्यास सांगितले होते.

Join our WhatsApp group