इचलकरंजी ; विवाहितेच्या छळ चौघांवर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पॉवरलूम व अन्य व्यवसायाकरिता माहेरहून पंधरा लाख रूपये आणावेत अशी मागणी करून सौ. दिपाली करण होगाडे (रा.इचलकरंजी, सध्या रा. विटा) या विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांविरूध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.पती करण, सासरे रघुनाथ दिनकर होगाडे, सासू शारदा व नणंद धनश्री रघुनाथ होगाडे अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. विटा येथील दत्तात्रय तारळकर यांची कन्या दिपालीचा विवाह इचलकरंजी येथील करण होगाडे यांच्याशी दि.१३ मे २०२१ रोजी झाला होता.

विवाहानंतर अवघ्या दोनच महिन्यात पती, सासरे, सासू व नणंद यांनी विवाहिता सौ. दिपाली हिचा शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी सासरच्या मंडळींना व्यवसायाकरिता १५ लाख रूपयांची आवश्यकता असल्याने ते पैसे दिपालीने वडिलांकडून आणावेत यासाठी तगादा लावला. त्या कारणाने दिपालीस उपाशी ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे यासह विविध घटना घडू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वडील दत्तात्रय तारळकर यांनी विट्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन पती करण व सासरे रघुनाथ यांच्याशी चर्चा केली व थोडे-थोडे पैसेही देण्याचे कबुल केले. त्यानंतरही दिपालीचा वारंवार छळ होऊ लागला. दि. २४ एप्रिल २०२२ रोजी तिला सासरच्या मंडळींनी घरातून हाकलून दिले. तेव्हापासून दिपाली विटा येथे माहेरी रहात असल्याचे फिर्यादीत म्हटले
आहे. याप्रकरणी विवाहिता दिपालीने पती करण, सासरे रघुनाथ, सासू शारदा व नणंद धनश्री या चौघांविरूध्द विटा पोलिसांत फिर्याद दिली.

Join our WhatsApp group