दिवाळीत राज्यात फटाक्यांची आतिषबाजी! विविध शहरांत आगीच्या घटना!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशभरासह राज्यभरात मोठ्या उत्साहात दिवाळी उत्सव सण साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांकडून जोरदार फटाक्यांची आतिषबाजी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. यामुळे सर्वांचा उत्साह हा द्विगुणित झाला आहे. मात्र फटाक्यामुळे राज्यातील विविध शहरांमध्ये आगीच्या घटना देखील घडल्या आहेत. वसई, ठाणे, पुण्यासह यवतमाळमध्ये काही ठिकाणी आग लागली. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.



पुण्यातील बिल्डिंगला आग
औंधमध्ये एक आगीची घटना पाहायला मिळाली. येथे एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर फटाक्यांमुळे मोठी आग लागली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. आग लागताच येथे मोठा गोंधळ उडाला होता. बिल्डिंगमधील संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच येथे अग्निशमन दलाच्या सात गाड्या रवाना झाल्या होत्या. सुदैवाने येथे जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

पालघर बुटांचे गोदाम जळाले
पालघर जिल्ह्यातील वसई येथील बुटांच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या होत्या. त्यांनी आग आटोक्यात आणली असल्याची माहिती वसई अग्निशमन विभागाने दिली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Join our WhatsApp group