Friday, February 13, 2026
Homeब्रेकिंगएसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! तिकीटदरात सवलतीसाठी नवा नियम, काय करावं लागणार?

एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! तिकीटदरात सवलतीसाठी नवा नियम, काय करावं लागणार?

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसप्रवासातून प्रवास करताना सवलतीस पात्र ठरणाऱ्या प्रवाशांसाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

बनावट आधार कार्ड वापर करून प्रवासी मोठ्या प्रमाणात सवलतींचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर महामंडळाने स्मार्ट कार्डची घोषणा केली होती.

 

महामंडळाच्या सूचनेनुसार सवलतधारकांनी स्मार्ट कार्डसाठी सशुल्क नोंदणी केली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या प्रकल्पाचा गोंधळ उडाला. पैसे भरूनही कार्ड न मिळणे, कार्डमध्ये रिचार्ज न होणे, अयोग्य कार्ड येणे अशा तक्रारींमुळे हा प्रकल्पच बारगळला. आता स्मार्ट कार्डऐवजी एनसीएमसी कार्ड सवलतधारकांना खरेदी करावे लागणार आहे.

 

ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तीन गोष्टी कार्डद्वारे शक्य होणार आहेत. प्रकल्पासाठी महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे.

 

‘एनसीएमसी’ कार्डसाठी पात्र

-शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड.

-ज्येष्ठ नागरिक, महिला, अमृत (७५ वर्षांवरील) ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार क्रमांक संलग्न कार्ड. -दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांक जोडून कार्ड.

-पुरस्कारार्थी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या सवलतधारकांना स्थानिक विभागीय कार्यालयातील आगारामार्फत वितरण.

 

 

जुन्या स्मार्ट कार्डवर ५० रुपयांची सूट

-जुन्या स्मार्ट कार्डवर ५० रुपयांची सूट नवे एनसीएमसी कार्ड १९९ रुपये (जीएसटीसह).

-जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.

-कार्डमध्ये १०० रुपयांचा रिचार्ज, ५० रुपयांच्या पटीत रिचार्जची सोय.

-वाहकांच्या ईटीआयएम मशिन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप किंवा नियुक्त एजंटमार्फत रीचार्जची सोय.

-ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या नोंदणीसाठी एसटी स्थानकांवर तीन हजार एजंटची नियुक्ती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -