Homeमहाराष्ट्रतूरीच्या दरात वाढ, बटाट्याच्या दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत...

तूरीच्या दरात वाढ, बटाट्याच्या दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाच्या दरात बदल, टोमॅटोच्या आवकेत घट तर संत्री दरात नरमाई

आज अकोला बाजारात तुरीची आवक सोमवारच्या तुलनेत १६४ क्विंटलने घटून ३५६ क्विंटल झाली. बाजारातील तुरीचा सरासरी दर १ हजार रुपयांनी वाढून आजचा दर १० हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला.

 

तर, अमरावती बाजारात तुरीची आवक सोमवारच्या तुलनेत ७२९ क्विंटलने घटून २५० क्विंटल झाली. मात्र, सरासरी दरात काहिशी वाढ होऊन आजचा दर १० हजार ३२५ रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, लातूर बाजारात तुरीची आवक कालच्या तुलनेत १९० क्विंटलने घटून १५२ क्विंटल झाली. या बाजारातील सरासरी दर ३७० रुपयांनी घसरुन १० हजार १०० रुपये प्रति क्विंटलवर आला.

 

बटाट्याच्या दरात चढ-उतार

 

आज नागपूर बाजारात बटाट्याची आवक सोमवारच्या तुलनेत २ हजार १०० क्विंटलने घटून २ हजार ६२५ क्विंटल झाली. मात्र, बटाट्याचा सरासरी दर १ हजार २५ रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता. तर, खेड-चाकण बाजारात बटाट्याची आवक कालच्या तुलनेत ४०० क्विंटलने वाढून आज १ हजार ४०० क्विंटल झाली होती. मात्र, सरासरी दर १ हजार २०० रुपयांवरून म्हणजेच १०० रुपयांनी घसरुन आज १ हजार १०० रुपये प्रति क्विंटल होता. तसेच, छत्रपती संभाजीनगर बाजारात बटाट्याची आवक ३२० क्विंटलने वाढून आज १ हजार २८० क्विंटल झाली. सरासरी दर १०० रुपयांनी वाढून आजचा दर १ हजार रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला.

 

ओल्या भुईमुगाच्या दरात बदल

 

आज खेड-चाकण बाजारात ओल्या भुईमुगाची आवक कालच्या तुलनेत १५ क्विंटलने वाढून आज १२५ क्विंटल झाली. मात्र, या बाजारातील ओल्या भुईमुगाचा सरासरी दर कालसारखाच आजही ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर पाहायला मिळाला. तर, छत्रपती संभाजीनगर बाजारात ओल्या भुईमुगाची आवक कालच्या तुलनेत फक्त ३ क्विंटलने घटून आज २७ क्विंटल झाली. सरासरी दर १ हजार रुपयांनी घसरून आज ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर आला.

 

टोमॅटोच्या आवकेत घट

 

आज पनवेल बाजारात टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत १०६ क्विंटलने घटून आज ७३८ क्विंटल झाली. मात्र, टोमॅटोचा सरासरी दर २७५ रुपयांनी घसरून २ हजार २५० रुपये प्रति क्विंटलवर आला. तर, नागपूर बाजारात टोमॅटोची आवक ८० क्विंटलने घटून आज ४२० क्विंटल झाली. मात्र, या बाजारातील सरासरी दर २ हजार २५ रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला. तर, चंद्रपूर-गंजवड बाजारात टोमॅटोची आवक ३७० क्विंटलने घटून ४४६ क्विंटल झाली. या बाजारातील सरासरी दर १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता.

 

संत्री दरात नरमाई

 

आज नागपूर बाजारात संत्र्याची आवक सोमवारच्या तुलनेत १ हजार ६६७ क्विंटलने घटून ५९० क्विंटल झाली. या बाजारातील संत्र्याचा सरासरी दर ३७५ रुपयांनी घसरून २ हजार ७५ रुपये प्रति क्विंटल होता. तर, सांगली-फळे भाजीपाला बाजारात संत्र्याची आवक सोमवारच्या तुलनेत २२ क्विंटलने घटून ४० क्विंटल झाली.सरासरी दर ३ हजार रुपयांनी घसरून आजचा दर ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -