श्रावण महिना हा भगवान शिव यांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक जण उपवास करतात. 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू होणार आहे. अशात उपवास सुरु झाल्यानंतर रोज काय खायतं असा प्रश्न उपस्थित राहतो. सांगायंच झालं तर, श्रावण महिन्यात आणि या उपवासादरम्यान साबुदाण्याची खिचडी हा सर्वात आवडता पदार्थ असतो. सहसा, साबुदाणा 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजवावा लागतो. पण जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. कुकरच्या एका सोप्या युक्तीने, तुम्ही फक्त काही मिनिटांतच स्वादिष्ट आणि कुरकुरीत साबुदाण्याची खिचडी बनवू शकता.
तर जाणून घ्या साबुदाणे न भिजवता कशी परफेक्ट खिचडी बनवता येते. सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ पाण्याने चांगला धुवून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. आता धुतलेला साबुदाणा एका स्टीलच्या भांड्यात ठेवा. त्यात थोडे साजूक तूप, चवीनुसार मीठ, थोडी साखर आणि अगदी थोडे पाणी घाला.
कुकरमधील वाफ: आता प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घाला. साबुदाणा असलेले स्टीलचे भांडे कुकरमध्ये ठेवा आणि त्यासोबत दोन कच्चे बटाटेही ठेवा. भांड्याचे झाकण बंद करा, कुकरवर झाकण ठेवा आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
थंड पाण्याने धुवा: 3 शिट्ट्या झाल्यावर कुकरचा दाब आपोआप कमी होईल, तेव्हा भांडे बाहेर काढा. साबुदाणा शिजलेला असेल आणि बटाटेही वाफेवर शिजलेले असतील. सुरुवातीला साबुदाणा थोडा चिकट वाटू शकतो. तो जाळीच्या चाळणीत काढून थंड पाण्याने चांगला धुवा. असं केल्याने सर्व दाणे मोकळे होतील आणि साबुदाण्याचा प्रत्येक दाणा सुटा होईल.
ग्रेव्हीची तयारी करा: आता कुकर स्वच्छ करून त्यात थोडे साजूक तूप गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आले आणि टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. तुमच्या आवडीनुसार, तुम्ही भाजलेले किंवा तळलेले शेंगदाणेसुद्धा तयार ठेवू शकता. आता कढईत तयार केलेला साबुदाणा आणि लहान तुकडे केलेले उकडलेले बटाटे घाला. नंतर चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, काळी मिरी पूड आणि भाजलेले शेंगदाणे घाला.
गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहे. सर्व साहित्य मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे हलक्या हाताने एकत्र करा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडा लिंबाचा रस घाला. तुमची झटपट साबुदाण्याची दाणे मोकळी झाली आहेत आणि स्वादिष्ट साबुदाणा खिचडी तयार आहे.


