कोल्हापूर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हदपार करण्यात आलेल्या एक जण आदेशाचा भंग करून हुपरी शहरात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हुपरी पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. शाहरुख मैनुद्दीन मुजावर (वय ३१, रा. संभाजी माने नगर झोपडपट्टी, हुपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शाहरुख मुजावर याच्यासह हुपरी शहरातील दहा जणांना पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर यांच्या आदेशान्वये दि.१६ मार्च २०२६ पासून एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीही शाहरुख मुजावर हा आदेशाचा भंग करून शहरात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी २० रोजी रात्री २:१५ वाजण्याच्या सुमारास संभाजी माने नगर झोपडी परिसरातील त्याच्या घरात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस हवालदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद को पोसई विजय काके, पोलीस हवालदार अमर मोरे, दत्तात्रय बांगर यांच्या पथकाने केली.


