आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आधारमध्ये ईमेल आयडी अपडेट करायचा असेल किंवा जुना ईमेल बदलायचा असेल तर आता त्यासाठी शुल्क द्यावं लागणार नाही. UIDAI ने आधारधारकांना दिलासा देत ईमेल अपडेटची सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत उपलब्ध करून दिली आहे.आधी आधारमध्ये ईमेल आयडी किंवा संबंधित तपशील अपडेट करण्यासाठी फी घेतली जायची. आता नवीन डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना हे काम घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामुळे आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज कमी होणार असून वेळ आणि मेहनतही वाचणार आहे.
Aadhaar Mobile App मधून होणार ईमेल अपडेट
UIDAI च्या नव्या Aadhaar Mobile App च्या माध्यमातून आधारशी संबंधित विविध सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधांचा यात समावेश आहे. युजर्सना अॅपवर लॉगिन करून आवश्यक पडताळणी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपला नवीन ईमेल आयडी अपडेट करता येईल.
ईमेल आयडी अपडेट करणं का महत्त्वाचं?
आज बँकिंग, विमा, सरकारी योजना आणि ऑनलाइन व्हेरिफिकेशनसह अनेक सेवांमध्ये ईमेलचा वापर केला जातो. आधारशी योग्य ईमेल आयडी लिंक असेल तर महत्त्वाचे अपडेट आणि नोटिफिकेशन वेळेवर मिळायला मदत होते. जुना किंवा चुकीचा ईमेल आयडी असल्यास काही महत्त्वाची माहिती मिळण्यात अडचण येऊ शकते.
त्यामुळे आधारमध्ये ईमेल आयडी अपडेट न केलेल्या किंवा जुना ईमेल बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतची मोफत सुविधा महत्त्वाची ठरू शकते. अपडेट करण्याआधी UIDAIच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाईटवरच्या ताज्या सूचनांची खात्री करणं योग्य ठरेल.

