Homeमहाराष्ट्रकूलरमध्ये पाणी भरताना मामाचा जागीच मृत्यू, भाचीनेही तडफडून जीव सोडला! मंगळवारी दुपारी...

कूलरमध्ये पाणी भरताना मामाचा जागीच मृत्यू, भाचीनेही तडफडून जीव सोडला! मंगळवारी दुपारी काय घडलं?

गोंदियामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील कूलरमध्ये पाणी भरताना अचानक विजेचा तीव्र प्रवाह उतरल्याने मामा आणि भाची या दोघांचा जागीच विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

ही खळबळजनक घटना आज तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि गावावर शोककळा पसरली आहे. भाग्यवान बावणे आणि त्यांची भाची सुप्रिया सुरेश सोनटक्के हे दोघे दुपारी घरातील विजेच्या कूलरमध्ये पाणी भरण्याचे काम करत होते.

 

अचानक कूलरच्या लोखंडी बॉडीमध्ये हाय व्होल्टेज करंट उतरला. पाण्यामुळे विजेचा प्रवाह वेगाने पसरला आणि दोघांनाही विजेचा तीव्र झटका बसला. हा झटका इतका भीषण होता की, मदतीसाठी आरडाओरड करण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांचाही घटनास्थळीच तडफडून अंत झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.

 

 

दरम्यान, ऐन सणासुदीच्या व कौटुंबिक वातावरणात मामा-भाचीचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने गुमाधावडा गावासह संपूर्ण तिरोडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक कूलरच्या लोखंडी बॉडीमध्ये करंट उतरला. पाण्यामुळे विजेचा प्रवाह वेगाने पसरला आणि दोघांनाही विजेचा तीव्र झटका बसला. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याने आता शोक व्यक्त केला जातोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -