आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या भावात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहे. या शक्यतेने सर्वसामान्य नागरिकांनी साखरेची खरेदी करून ठेवली आहे. या कारणाने साखरेची मागणी घटली आहे. त्यामुळे साखरेच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचा दर किलोमागे ७ रुपयांनी वाढ झाली आहे, त्यामुळे साखर महागच आहे.
या आठवड्यात मार्केट यार्डातील घाऊक बाजारात किलोमागे ७ रुपयांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील साखरेचे व्यापारी ईश्वर नहार यांनी दिली. तर मागील आठवड्यात किलोमागे १५ रुपयांनी घसरण झाली होती. तर सणांमुळे गुळाला मागणी आहे. मात्र, कमी झालेले गुळाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
साखरेच्या भावात मागील पंधरा दिवसांपूर्वी मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजना केली. परदेशातून तयार १० लाख टन साखर आयात करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे साखरेच्या भावात घट झाली आहे. मात्र, आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हा सणासुदीचा काळ आहे.
या कालावधीत साखरेच्या भावात मोठी वाढ होण्याच्या शक्यतेने सर्वसामान्य नागरिकांनी साखर खरेदी करून त्याचा साठा केला. परिणामी, आता घरगुती ग्राहकांकडून साखरेची मागणी घटली आहे. किराणा दुकानदारांकडून साखरेची बेताने खरेदी करण्यात येत आहे. या कारणाने मार्केट यार्डातील साखरेचा व्यवहार कमी झाला आहे.
मोदकाचा उत्पादन खर्च वाढला
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात गोड पदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, साखर, दूध आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे मिठाई आणि प्रसादाच्या पदार्थांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. प्रमुख कारणे आणि परिणामः कच्च्या मालाची महागाई साखर, गूळ, तांदूळ, नारळ आणि दुधाचे दर वाढल्याने मिठाई व मोदक तयार करण्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. उकडीचे मोदक महागलेः सणासुदीत विशेष मागणी असणाऱ्या उकडीच्या मोदकाचा दर प्रतिनग ३५ ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
ग्राहकांनी करून ठेवलेली साखरेची खरेदी, भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने आखलेल्या धोरणामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात साखरेच्या भावात घट झाली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी ६८ रुपये किलो झालेली साखर कमी होऊन ४५ रुपये झाली. साखरेच्या दरात ५ ते ७रूपयांनी किलोमागे वाढ झाली असून मार्केट यार्डातील घाऊक बाजारात किलोला ४८ ते ४९ रुपये भाव मिळत आहे. किरकोळ दरात ५२ ते ५४ रुपये किलो भाव आहे.
