Homeमहाराष्ट्रज्वारी तांदळासह डाळींच्या दरात वाढ

ज्वारी तांदळासह डाळींच्या दरात वाढ

दुष्काळामुळे खरीप हाताचा गेला, तर रब्बीची आशाही मावळल्याने बाजारात ज्वारी बरोबरच तांदळाच्या दरातही किलोमागे १० ते २० रूपयांची वाढ झाली आहे. सांगलीच्या बाजारात डाळींचे दरही भडकले असून आवकही मंदावली आहे. ४५ रूपये किलोने मिळणारी शाळू ज्वारी ६५ रूपये किलोवर पोहचली असून आणखी दरात वृध्दी होण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.

 

गेल्या महिन्यात ज्वारीचे दर ४० ते ४५ रूपये किलो असलेले आठ दिवसापासून वाढत असून सांगलीच्या बाजारात शाळू ज्वारीचे दर क्विंटलला ६५०० रूपयावर पोहचले आहेत. मालाची आवक पूर्णपणे ठप्प असून शाळू पिकाचे मुख्य उत्पादन होणार्‍या जत, सांगोला, मंगळवेढा, बाशी या परिसरात परतीच्या पावसानेही दगा दिल्याने पेरण्याच होउ शकणार नाहीत अशी स्थिती आहे. (sorghum) यामुळे आवकही थांबली आहे. गोदाामात शिल्लक असलेली ज्वारी बाजारात येत असून त्याचे दर दिवसागणिक वाढत आहेत. किरकोळ बाजारात ज्वारीचा दर प्रतवारीनुसार ६० ते ७० रूपये प्रतिकिलो आहे.

 

दरम्यान, ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने भाताचे आगर असलेल्या कोकण, कोल्हापूर, शिराळा परिसरात भाताची लोंबीच भरली नसल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची चिन्हे दिसत आहेत. (sorghum) यामुळे तांदळाच्या दरातही वाढ झाली आहे. ४० ते ४५ रूपये प्रतिकिलो असलेला सोनामसुरी तांदळाचा दर आता ६८ ते ७० रूपये झाला आहे, तर ६०-६५ रूपयांचा कोलम ७४ ते ७५, १०० रूपये किलोचा इंद्रायणी १२० रूपये आणि १२० रूपये किलो मिळणारा बासमती १६० रूपये किलोवर पोहचला आहे.

 

बाजारात २५ ते ३० रूपयांनी मिळणार्‍या बाजरीचा दर ३५ ते ३८ रूपयांवर पोहचला असून किरकोळ बाजारात ४० रूपयावर दर पोहचला आहे. या तुलनेत गव्हाचा दर स्थिर असून ठोक बाजारात सरासरी दर ३ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल आहे. दरम्यान खरीप हंगामातील मूग, मटकी, उडीद या कडधान्याचे उत्पादन अल्प असल्याने डाळींच्या दरातही सातत्याने वृध्दी होत आहे. १२० रूपयांची तूरडाळ १५० रूपये, मूगडाळ १८० रूपये आणि हरभरा डाळ ९५ रूपये प्रतिकिलोने विकली जात आहे.

 

खरीप हंगाम वाया गेल्याने संकरित ज्वारीची उपलब्धता कमी झाली आहे. (sorghum) आणि रब्बी हंगामाचीही आशा उरली नसल्याने शाळू दरात वाढ होत असून पुढील महिन्यात शाळूचे दर ७५ रूपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तांदळाचे कमीत कमी दर किलोला ७० रूपयापर्यंत पोहचले असल्याने तुकडा तांदळाला मागणी वाढली आहे. सुवासिक तांदळाचे खरेदी केवळ समारंभासाठीच केली जात असून रोजच्या वापरासाठी कमी दराच्या तांदळाची मागणी ग्राहकाकडून होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -