Homeमहाराष्ट्ररेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या...

रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पतधोरणविषयक समितीच्या बैठकीनंतर काल रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवून 5.50 टक्के करण्यात आला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.

 

सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांकडून रेपो रेटमध्ये वाढ होताच रेपो लिंक्ड कर्जाच्या व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळं गृह कर्ज आणि इतर कर्जांचे व्याज दर वाढणार आहेत. तर, रेपो लिंक्ड व्याज दरावर ज्यांनी गृहकर्ज काढली आहेत, त्यांच्या हप्त्याची रक्कम वाढेल किंवा कर्जाचा कालावधी वाढू शकतो.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फेब्रुवारी 2023 नंतर व्याज दरात वाढ केली आहे. आरबीआयनं फेब्रुवारी 2025 नंतर व्याज दरात कपात सुरु केली होती. रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन व्याज दर 5.25 टक्क्यांपर्यंत कमी झाला होता. आता पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळं कर्ज देखील महागणार आहेत.

 

आरबीआयनं रेपो रेटमध्ये वाढ करताच पीएनबी, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदाकडून रेपो लिंक्ड लोनच्या व्याज दरात वाड करण्यात आली आहे. यामुळं रेपो लिंक्ड व्याज दरावर कर्ज घेणाऱ्या कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे किंवा कर्जाचा कालावधी वाढू शकतो.

 

पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियानं कर्जाच्या व्याज दरात वाढ केली आहे. या बँकांचा व्याज दर 8.10 टक्क्यांवरुन 8.35 टक्के करण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियानं नव्या व्याज दर 7 ऑक्टोबरपासून लागू केला आहे. इंडियन बँकेनं आरबीएलआर दर 7.95 टक्क्यांवरुन वाढवून 8.20 टक्के केला आहे. बँक ऑफ बडोदानं देखील रिटेल लोनसाठी बीआरएलएलआर 8.15 टक्के केला आहे. हे दर 8 ऑक्टोबरपासून लागू आहेत.

 

रेपो रेट म्हणजे काय?

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना ज्या व्याज दरानं पैसे देते त्याला रेपो रेट म्हणतात. जेव्हा आरबीआयकडून रेपो रेट वाढवला जातो तेव्हा बँकांना निधी जमा करण्यासाठी अधिक रक्कम खर्च करावी लागते. याचा परिणाम ग्राहकांवर होतो. ज्यामुळं त्यांचं गृहकर्ज किंवा इतर फ्लोटिंग रेट आधारित कर्ज महागते. बँका त्या स्थितीत ईएमआयची रक्कम वाढवतात अथवा ईएमआयची रक्कम तिच ठेवत, कर्जाचा कालावधी वाढवतात.

 

गृहकर्ज ज्यांनी घेतलं असेल त्यांनी बँकांना व्याज दरवाढीचा ईएमआयवर किंवा कर्जाच्या कालावधीवर काय परिणाम होईल, हे विचारलं पाहिजे. गृहकर्जदारांना शक्य असल्यास त्यांनी दरवर्षी प्रीपेमेंट केल्यास व्याजाची रक्कम कमी होऊ शकते. रेपो रेट वाढल्यानंतर इतर बँका देखील व्याज दरात वाढ करु शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -