Homeमहाराष्ट्रजाकाईदेवीच्या दागिन्यावर डल्ला; सात जणांना अटक

जाकाईदेवीच्या दागिन्यावर डल्ला; सात जणांना अटक

आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील जाकाई देवीच्या दागिन्यावर डल्ला मारणान्या टोळीतील सात जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ४ किलो चांदीच्या दागिन्यांसह सुमारे साडेनऊ लाखाचे साहित्य जान करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली आहे.

 

चोरट्यांनी दि. २२ जून २०२६ रोजी जाकाई देवीचे दागिने असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून बोरी केल्याचे उघडकीस आले होते. चोरट्यांनी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करून घरातील कपाटात असलेले सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता आरबाज

 

जैनुल मिराखान (वय २७,रा. सई), बादशाह अल्लाबक्ष यमतनाळ (वय २६ रा. कबनूर.), सोहेल महम्मद रफिक दड्डीकर (२८, रा. कबनूर), प्रमोद रावसो सव्वाशे (३४, रा. कबनूर), शशीकांत अशोक दबडे (२७, रा. नेलकरंजी), विनायक सुनिल पाटील (२६, रा. रुई), विनोद रावसाहेब यादव ( ३१. रा. व्हजुर) या सात जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर तबरेज खान, सदाम पठाण (दोघेही रा. इचलकरंजी) आणि उमाजी गुजले (रा. बलगवड) हे तिथे पसार झाले आहेत. या गुन्ह्याचा छडा लावताना पोलिसांनी ८ लाख ४९ हजार रुपये किमतीचे चांदीचे ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे दागिने जाम केले आहेत. अधिक चौकशीत चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्यासर्वांना आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -