Homeइचलकरंजीइचलकरंजीत वाहतूक कोंडीचा विळखा कायम महानगरपालिकेचे नियोजन; मात्र वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

इचलकरंजीत वाहतूक कोंडीचा विळखा कायम महानगरपालिकेचे नियोजन; मात्र वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

इचलकरंजी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, शहरातील प्रमुख ने आणि चौकांमध्ये वाहनांच्या लांबच रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवून मुख्य रस्ते आणि पदपथ मोकळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, दुसरीकडे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यक्षमतेचावत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

 

शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून होत असताना, प्रत्यक्षात वाहतुकीची कोंडी कमी होण्याऐवजी अनेक ठिकाणी ती अधिकच वाढल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेचा अपेक्षित फायदा वाहनधारकांना आणि नागरिकांना का मिळत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतला असताना वाहतू‌क पोलीस शाखेनेही त्याला पूरक अशी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा एका बाजूला सने मोकळे करण्याची मोहीम आणि दुसन्या बाजूला वाहतुकीचा वाढता खोळंबा, अशी विसंगत परिस्थिती कायम राहणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

दिवाळीच्या पार्श्वभूमी मुख्य रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी (छाया-मपुर चिदे)

 

पोलिसांचे नियोजन दिसेना!

 

शहरातील शाहू पुतळा, शिवतीर्थ चौक, शंभूतीर्थ चौक (मलाबादे चौक), मेन रोड, दोन नंबर शाळा पीसर, गोविंदराव हायस्कूल परिसर, न्यायालय परिसर, महासता चौक, सांगली नाका नदी नाका, मार्केट परिसर तसेच मराठा चौक अशा प्रमुख ठिकाणी सकाळी आणि मायंकाळी वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे

 

या ठिकाणी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, मालवाहू वाहने आणि पादचारी यांची एकाच वेळी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा ताण वाढतो. अनेकदा चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होते. वाहनांच्या रांगा लागून नागरिकांना काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वाहक आणि कामानिमित बाहेर पडणाच्या नागरिकांनाही याचा जास सहन करावा लागत आहे.

 

रस्ते मोकळे का नाहीत?

 

महापालिका प्रशासन अतिक्रमण हटविण्यासाठी

 

पावत्या फाडण्याची तत्परता

 

शहरात वाहतूक पोलीस शाखा कार्यरत असतानाही वाहतुकीचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयाजवळच पोलीस कर्मचारी उभे असलेले दिसतात; मात्र वाहतुकीचे प्रत्यक्ष नियंत्रण, वाहनांची कोंडी मोडविणे आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरजीत ठेवण्याची गरज असताना पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

 

मोहीम राबवत आहे. मात्र, सत्यांकील अतिक्रमणे हटविल्यानंतर त्या जागेचा वाहतुकीसाठी बोग्य बाप्पा होतो आहे का, याची संयुक्त पाहणी होणे आवश्यक आहे.

 

सत्याच्या कडेला होणारे बेशिस्त पार्किंग, मालवाहू वाहनांची ये-जा हातगारांची अतिधांचे आणि बाजारपेठेतील गर्दीवावर नियंत्रण नसेल तर केवळ अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. शहराच्या वाहतुकीसाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस शाखा यांच्यात समन्वय असणे अत्यावश्यक आहे. मात्र, दोन्ही यंत्रांच्या कामात समन्वयाचा अभाव असल्यास नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -