Homeइचलकरंजीमारहाण करून जीवे मारण्याची धमकी नऊजणांवर गुन्हा

मारहाण करून जीवे मारण्याची धमकी नऊजणांवर गुन्हा

मघटस्फोटाच्या नोटीस वरून सासरच्या लोकांनी तसेच त्यांच्या मित्रांनी बेदम मारहाण करून मोबाईल काढून घेतला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद चेतन महेश पाटील (वय २८, रा. व्यंकटेश्वरा हायस्कूल मागे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बार जणांसह काही अनोळखी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याचाबत अधिक माहिती अशी की, चेतन महेश पाटील याने संशयित आरोपी राजू दादा पाटील यांच्या बहिणीशी प्रेम विवाह केला आहे. नंतर दोघा पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून मांडण झाले. त्यानंतर चेतन पाटील बास पत्नीने घटस्फोटाची रोटीस पाठवली होती. सदर नोटीसीता फिर्यादीने

 

देखील वकिलामार्फत उत्तर दिले होते. यामुळे सासरकडील मंडळी फिर्यादी चेतन पाटील याच्यावर चिडून होते. त्यातूनच शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजू दादा पाटील, सुरेश सुभाष सुतार यांनी फिर्यादी चेतन पाटील बास घरातून बोलावून घेतले. इनोव्हा गाडीतून त्यास कबनूरच्या ओडधाजवळ नेऊन लाथाबुक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. यावेळी रोहन पिरगोंडा पाटील, महादेव दादा पाटील यांनी तसेच राजू पाटील यांच्या अन्य चार ते पाच मित्रांनी वेतन यास लाथा बुक्क्यासह दगडांनी मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवरून बसून चेतन बास घराजवळ नेले. तेथेही कपडे फाडून मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. या मारहाणीत चेतन पाटील जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजू पाटील, सुरेश सुतार, रोहन पाटील, महादेव पाटील (सर्व रा. पाटील मळा कबनूर) यांचेसह काही अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो. स. ई. संभाजी भोस्कर करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -