Homeराजकीय घडामोडीसर्वात मोठी उलथापालथ! पवार गटाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, NDA च्या बाजूने मत...

सर्वात मोठी उलथापालथ! पवार गटाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, NDA च्या बाजूने मत देणार!

सध्या देशात डिलिमिटेशन विधेयक जोरदार चर्चेत आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकामुळे जर 50 टक्के जागा वाढणार असतील तर आपला या विधेयकाला पाठिंबा असेल, असं वक्तव्य केलं होतं. याविषयी आपण इंडिया आघाडीशीही चर्चा करु असाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता पक्षाचे राज्यातील दुसरे बडे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनवरुन पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच डिलिमिटेशन हे अनिवार्य असल्याचे सांगत डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

 

पवार साहेबांशी माझी या विषयावर यापूर्वीही चर्चा झाली होती. तेव्हा डिलिमिटेशनचा विषयही नव्हता. पण तेव्हा साहेबांनी मला सांगितलं होतं की, डिलिमिटेशन हे कॉन्स्टिट्यूशनल असतं आणि ते करावं लागतं. त्याला काही पर्याय नसतो. आपापले मतदारसंघ बांधायला शिका, कितीदिवस असं चालायचं. ही सगळी आमची अनौपचारिक चर्चा होती, असं यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं. पुढे आव्हाड म्हणाले की, मी ओपनली सांगतो, साहेब हे माझे दैवत आहेत. माझ्या दैवताची भूमिका जी, तिच माझी भूमिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -