Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रकर्मचाऱ्याचा कारसह तलावात बुडून मृत्यू

कर्मचाऱ्याचा कारसह तलावात बुडून मृत्यू

शिरसोली रोडवरील जैन इरिगेशन कंपनीत फिटर पदावर काम करणाऱ्या (४२ वर्षीय) व्यक्तीचा काल (रविवार) कार शिकत असताना कार तलावात पडून मृत्यू झाला. हा घातपात असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, हा अपघात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. जावेद अलियार खाँ पठाण असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

गेल्या २० वर्षांपासून जैन कंपनीत फिटर पदावर नोकरीत होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता जावेद हे कैलास राठोड यांच्यासह कंपनीची चारचाकी शिकत होते. सुमारे दोन-तीन किलोमीटर अंतर कापल्यानंतर घाटात ब्रेकऐवजी त्यांनी एक्सलेटर दाबले. यामुळे चारचाकी वेगाने घाटातून पुढे जाऊन तलावात कोसळली. या वेळी कैलास राठोड कसेबसे बचावले; पण जावेद यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -