ताजी बातमी ऑनलाईन टीम
बॉलिवूडमध्ये एम एस धोनी, केदारनाथ आणि छिछोरे यासारखे चित्रपट देणाऱ्या सुशांत सिंह राजपूतचा आज ३६ वा जन्ममदिवस (Sushant Singh Rajput Birth Anniversary) आहे. सुशांतने घरच्यांचा विरोध डावलून जाईन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. यशाच्या शिखरावर पोहोचला असताना मात्र तो हे जग सोडून गेला. ३०० कोटींची कंपनी, १ स्पेस मुव्ही आणि चंद्रावर जमीन सोडून सुशांतने आपले जीवन संपवले होते. ज्यावेळी आयुष्यात काही गोष्टी असह्य होतात, त्यावेळी आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारला जातो. असंच काहीसं सुशांतविषयी झालं. त्याच्या जन्मदिनी त्याला आठवण करत त्याच्याविषयी तुम्हाला माहित नसलेल्या या गोष्टी जाणून घ्या.
एकता कपूरनं सुशांतच्या स्माईलवर फिदा होऊन दिलं होतं काम
पहिलीच मालिका पवित्र रिश्तामध्ये एकता कपूरने सुशांतच्या स्माईलवर फिदा होऊन त्याला मानव देशमुखची भूमिका दिली होती. पण, एकताची क्रिएटिव्ह टीमला सुशांत हा या भूमिकत नको होता. पण, सुशांतला भूमिका मिळाली आणि तो रातोरात स्टार झाला.
पीकेसाठी घेतले नव्हते पैसे
काय पो छे च्या शूटिंग दरम्यान त्याने राजकुमार हिरानीचा चित्रपट पीकेदेखील साईन केला होता. हा त्याचा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटासाठी सुशांतने पैसे घेतले नव्हते. बदल्यात राजकुमार हिरानी यांनी त्याला भेट म्हणून अनेक पुस्तके दिली होती.
यशराज प्रोडक्शनसोबत साईन केलं कॉन्ट्रॅक्ट
यशराज प्रोडक्शनने सुशांत सोबत तीन चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. पहिला चित्रपट शुध्द देसी रोमान्स आणि दुसरा चित्रपट डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी होता. कॉन्ट्रॅक्ट अनुसार सुशांतला दुसऱ्या चित्रपटासाठी ६० लाख रुपये मिळणार होते. पण, त्याला १ कोटी रुपये मिळाले. शेखर कपूर दिग्दर्शित तिसरा चित्रपट पानी बंद झाल्यानंतर सुशांतने आपलं कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणलं.
तीन कंपन्यांचं स्वप्न
२६ एप्रिल २०१८ मध्ये सुशांतने दोन लोकांसोबत मिळून स्वत:ची कंपनी Innsaei Ventures स्थापन केली होती. या कंपनीत सुशांत ३०० कोटींची गुंतवणूक करणार होता. जी नव्या टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार होती.
सुशांत आपल्या या कंपनीच्या माध्यमातून १२ बायोपिकची निर्मिती करणार होता. यामध्ये तो विविध ऐतिहासिक भूमिका साकारणार होता. चित्रपटांमध्ये बिझी असल्याने तो प्रोडक्शनमध्ये फोसकस करू शकला नाही.