Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंगHappy Republic Day 2022: WhatsApp Stickers पाठवून द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, जाणून...

Happy Republic Day 2022: WhatsApp Stickers पाठवून द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, जाणून घ्या कसे करावे डाउनलोड

यंदा देश आपला 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या निमित्ताने प्रत्येक देशवासीय देशभक्तीचा आनंद साजरा करतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडिया गेटवर परेड आयोजित केली जाते आणि विविध राज्यांचे चित्ररथ येथे पथसंचलन करतात. प्रत्येकजण आपली देशभक्ती वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. कारण प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही देखील WhatsApp च्या मदतीने हा प्रजासत्ताक दिन खूप सुंदर बनवू शकता. या ऐतिहासिक प्रसंगी तुम्ही मित्रांना आणि कुटुंबियांना व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवून या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता

व्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त लेटेस्ट फोटो, स्टेटस आणि कोट्स देखील वापरू शकता. स्टेटस सेट करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Republic Day 2022 ची इमेज डाउनलोड करा आणि ती तुमच्या WhatsApp स्टेटसवर अपलोड करा. whatsapp status वर कोट्स टाकूनही तुम्ही देशभक्तीची भावना व्यक्त करू शकता. मित्रांना WhatsApp Stickers पाठवून तुम्ही या दिवसाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. WhatsApp Stickers कसे इन्स्टॉल करायचे आणि पाठवायचे ते जाणून घेऊ.

तुम्हालाही Republic Day 2022 ला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा द्यायच्या असतील तर स्टिकर्स पाठवणे खूप खास असेल.

यासाठी प्रथम तुमचे व्हॉट्सअॅप उकाऊंट ओपन करा आणि एका चॅटवर जा.

चॅटमध्ये दिलेल्या स्मायली आयकॉनवर क्लिक करा. येथे तळाशी तुम्हाला स्टिकर्सचा पर्याय दिसेल.

स्टिकर्सच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्ही आधी डाउनलोड केलेले स्टिकर्स तुमच्या समोर ओपन होतील. तुम्ही कधीही स्टिकर डाउनलोड केले नसल्यास ते पेज रिकामे दिसेल.

त्यानंतर तेथे ‘+’ बटणावर क्लिक करा आणि तळाशी डिस्कव्हर स्टिकर अॅपवर टॅप करा.

तेथे टॅप करताच तुम्हाला थेट Google Play Store वर नेले जाईल. सर्च बारमध्ये तुम्हाला Republic Day 2022 टाइप करून सर्च करायचे आहे.

यानंतर तुम्हाला Republic Day 2022 चे अनेक Stickers पर्याय दिसतील यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.

त्यानंतर ते अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि इंस्टॉल केल्यानंतर ओपनचे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.

अॅप ओपन होताच तुम्हाला अनेक पॅक दिसतील. तुम्हाला जो पॅक वापरायचा आहे त्यावर क्लिक करा आणि अॅड टू व्हॉट्सअॅपवर जाऊन ते WhatsApp मध्ये अॅड करा.

WhatsApp वर अॅड होताच या पॅकमधील सर्व स्टिकर्स तुम्हाला स्टिकर्सच्या पर्यायावर गेल्यास दिसतील.

यानंतर तुम्ही तुमच्या प्रियजनांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2022 पाठवू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -