Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगपालकांसाठी मोठी बातमी! आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज 16 फेब्रुवारीपासून भरता येणार

पालकांसाठी मोठी बातमी! आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज 16 फेब्रुवारीपासून भरता येणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आरटीईअंतर्गत मुलांचा शाळेत प्रवेश घेण्याची तयारी करत असलेल्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2022_ 23 साठी आरटीईअंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज आता 16 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. आरटीई पोर्टलवर (RTE portal) हे अर्ज आधी 01 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार असल्याचे कळवण्यात आले होते. मात्र आता त्याऐवजी 16 फेब्रुवारी 2022 पासून (बुधवार) पालकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.



शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत असं आवाहन केले आहे. RTE पोर्टलवर सविस्तर सूचना देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी असं आवाहन शिक्षक संचालक दिनकर टेमकर (Dinkar Temkar) यांनी या संदर्भातील प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील मुला व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -